औरंगाबाद : चहावाल्याने केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष

Foto

औरंगाबाद- मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या दणदणीत विजयाचा औरंगाबादेत युवक काँग्रेसकडून जल्लोष साजरा करण्यात आला. पैठणगेट येथे नागरिकांना मिठाई वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. येथील चहावाल्यानेही काँग्रेसच्या विजयाचा मिठाई वाटप करुन आनंद साजरा केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपला पराभवाची धूळ चारली आहे.

भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेतृत्वाने सत्ता खेचून आणली आहे. या विजयाचा युवक काँग्रेसतर्फे पैठण गेट येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते इब्राहीम पठाण, अॅड.सय्यद विक्रम, युवक काँग्रेसचे शहर जिल्हा युवक अध्यक्ष मुजफ्फर खान, प्रदेश सचिव अकील पटेल, पश्चिम विधानसभा अध्यक्ष मुजाहीद खान पटेल, पूर्व विधानसभा अध्यक्ष मोहसीन खान, निलेश आंबेवाडीकर, शेख शफिक सरकार, सलमान पटेल, इरफान इब्राहीम पठाण, नदीम सौदागर, नदीम पटेल, इरफान खान, माजेद खान, शेख अजहर, सलमान नवाब पटेल, जावेद देशमुख, आमेर रफीक खान, पठाण जावेद खान, फैसल बाबा पटेल, डॉ.शादाब, उमर पठाण, मोहीत जाधव, इमरान पठाण, मुस्तफा खान, अश्फाक कुरेशी, साजेद कुरेशी उपस्थित होते.